कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.यंदाचे नवरात्र उत्सवाचे दहावे वर्ष असून त्या अनुषंगाने दिनांक 26 पासून 5 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भक्तांना श्री लक्ष्मी देवीच्या विविध रूपांचे दर्शन होणार आहे.
दिनांक 26 रोजी सायंकाळी सात वाजता मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दिनांक 27 रोजी भजन होणार असून दिनांक 28 रोजी देखील सायंकाळी सहा वाजता भजनाचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत त्यानुसार दिनांक 29 रोजी सकाळी 10.30 वाजता चंडी होम होणार आहे.
दिनांक 30 रोजी कुंकूमार्चन 1 वाजता होणार आहे.
तसेच दिनांक 1 रोजी 5 वाजता हळदी कुंकू कार्यक्रम पार पडणार आहे.तसेच दिनांक 2 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायं 7 पासून महाप्रसाद वितरणाला सुरुवात होणार आहे.त्यानंतर दिनांक ३ रोजी कुमारीका पूजनाचे आयोजन करण्यात आली आहे.दि 4 रोजी सायंकाळी 8.30 मिनिटांनी महाआरती होणार आहे.
दिनांक 5 रोजी सायं 5 वाजता भव्य विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पार पडणार आहे.यामुळे नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि भक्ती भावाने उपस्थित राहणारे भक्तमंडळी अशा प्रसन्न वातावरणामध्ये कांगली गल्ली येथील नवरात्र उत्सव पार पडणार आहे.