बेळगावत क्रिकेट रुजवणे, बेळगावत क्रिकेट वाढवणे आणि बेळगावचे क्रिकेट हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणारे बेळगावचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अविनाश पोतदार. बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे धारवाड विभागीय समन्वयक असून त्रिवेंद्रम येथे होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या संघातील पहिल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यासाठी ‘सामना निरीक्षक’ म्हणून बेळगावच्या अविनाश पोतदार यांची निवड झाली आहे.
बेळगाव व धारवाड विभागातील क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यात अविनाश पोतदार यांचे मोठे योगदान आहे.त्याचप्रमाणे बेळगाव ऑटो नगर येथे केससीएसचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात पोतदार यांचा सिंहाचा वाटा आहे.कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या विविध उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेत, बीसीसीआयने त्रिवेंद्रम येथे 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पहिला टी ट्वेंटी सामन्याच्या निरीक्षक पदी अविनाश पोतदार यांची निवड केली
बेळगाव लाईव्हने अविनाश पोतदार यांची विशेष मुलाखत घेऊन त्यांच्या निवडीबाबत आणि एकंदरीतच बेळगाव क्रिकेट जगताबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या निवडीबद्दल विचारले असता त्यांनी या बीसीसीआय तर्फे ही निवड करण्यात आली असून त्यांच्या क्रीडा जगतातील कार्याची दखल घेऊन के सी ए च्या शिफारशी नुसार बीसीसीआयने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
त्रिवेंद्रम येथे 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच साठी ही निवड झाली असून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे महत्त्वाचे असल्याचे अविनाश पोतदार यांनी सांगितले.तिकीट वाटप,मॅचसाठीच्या सुविधा,पासेस वितरण याची सर्व जबाबदारी निरीक्षकांकडे असते.जी जबाबदारी दिली ती पार पाडणे गरजेचे आहे असे नमुद केले.
बेळगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात पोतदार यांचा सिंहाचा वाटा वाटा असून सदर स्टेडियम बाबत त्यांच्याशी संवाद साधला असता शहरातील ऑटो नगर मध्ये के सी ए क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. पुढील वर्षी फ्लड लाईट बसवण्याचा विचार आहे.अंदाजे 5 कोटींचे बजेट आहे.ऑटो नगर स्टेडियमवर गॅलरी देखील लवकरच उभारण्यात येणारं आहे.उत्कृष्ट सुविधांसाठी बेळगावच्या मैदानाचे नाव बीसीसीआयनी नोंद केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बेळगावच्या उद्योनमुख खेळाडूंना अविनाश पोतदार यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे यामुळे क्रिकेट जगतामध्ये असणाऱ्या खेळाडूंना कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल याबाबत सांगताना अविनाश पोतदार यांनी बेळगावाच्या मैदानावर 83 यार्डची बोउंडरी लाईन,सुविधा सह एक उत्कृष्ट मैदान आहे.पूर्वी आम्ही मटिंग वर खेळत होतो मात्र आता टर्फ विकेट उपलब्ध आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने तर्फ विकेटवर खेळले जातात त्यामुळे या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बेळगाव मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होतील का याबाबत त्यांनी फ्लड लाईट, पब्लिक गॅलरी ब्रॉडकास्टिंग रूम, शहरात पंचतारांकित हॉटेल संख्येत वाढ होणे आवश्यक आहे.प्रामुख्याने विमानांची वर्दळ वाढल्यास व पंचतारांकित हॉटेल उपलब्ध झाल्यास नक्कीच पुढील भविष्यकाळात आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन होणे शक्य असल्याचे सांगितले.कमिटमेंट महत्त्वाची असून युवा खेळाडूंनी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणे तसेच शिस्त सतत सराव करणे गरजेचे आहे प्रत्येक पालकांना आपला मुलगा दर्जेदार खेळाडू आहे असे वाटते मात्र चोहोबाजूने विचार करून स्व पणा सोडून इतर खेळाडू कशा पद्धतीने खेळत आहेत याबाबत देखील पाहणे गरजेचे आहे सारासार विचार करता प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.