बेळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक निर्विघ्नपणे पार पडली असताना तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील गणेश विसर्जन उत्साहात संपन्न झाले.बेळगावच्या ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो
ग्रामीण भागात अनेक मंडळांनी डॉल्बीचा दणदणाटात मिरवणूक काढली डॉल्बीच्या आवाजाने बेळगाव शहरातील कोनवाळ गल्ली येथील प्रसाद देसुरकर यांच्या घराची भिंत देखील कोसळल्याची घटना घडली आहे.शहरा बरोबर ग्रामीण भागात देखील डॉल्बीचे पेव वाढले असे असताना हलगा येथील शिवनेरी चौक मरगाई गल्लीच्या सार्वजनिक गणेश मंडळाने डॉल्बीला फाटा देत आपल्याच गल्लीतील मुले मुलींच्या लेझीम सह विसर्जन मिरवणूक काढत वेगळेपण जपले आहे.
शिवनेरी चौक हलगा या गणेश मंडळाने आपल्या गल्लीतील लहान मुलांना लेझीमचे प्रशिक्षण दिले.मंडपा समोर दररोज मुले सराव करत होती चारच दिवसांत लेझीमच्या स्टेप्स शिकलेल्या मुलांनी पूर्ण गावभर मिरवणुकीत गणेश भक्तांना लेझीमची प्रात्यक्षिक दाखवत मिरवणुकीत वाहवा मिळवली.
शिवनेरी युवक मंडळाच्या मिरवणुकीत चारशे हुन अधिक भक्त सहभागी झाले होते पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढल्याने या मंडळाचे कौतुक देखील होत होते.
या मंडळाने डॉल्बीला फाटा आपल्या मुलांना खास प्रशिक्षण देऊन लेझीम सह मिरवणूक काढत वेगळं पण जपत ग्रामीण भागाला आदर्श घालून दिला आहे. त्याचा आदर्श गावांतील आणि ग्रामीण भागातील मंडळांनी घ्यायला काहीच हरकत नाही.
बेळगावचा गणेश उत्सव विधायक आणि पारंपरिक पद्धतीकडे आणण्यासाठी अश्या उपक्रमाना प्रोत्साहन देणे ही देखील गरज बनली आहे समाज बळकटीसाठी विधायक गणेश उत्सव साजरा केला तर लोकमान्य टिळकांचा उद्देश्य पूर्ण होणार आहे.