Sunday, November 24, 2024

/

*त्या 22 शाळा उद्यापासून सुरू: गोल्फ कोर्स मधील शोध मोहीम अयशस्वी*

 belgaum

वन खात्याकडून गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेली ऑपरेशन बिबट्या शोध मोहीम अखेर अपयशी ठरली आहे रविवारी तिसाव्या दिवशी मोठ्या प्रमाणात वन खाते आणि पोलीस खात्याने दिवसभर गोल्फ कोर्स जंगलात ज कोंबिंग ऑपरेशन राबविले मात्र बिबट्याला पकडण्यात रविवारी ही वन खात्याला अपयश आले आहे.

गेल्या 5 ऑगस्टपासून वन खात्याच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली होती मात्र बेळगावात दाखल झालेल्या चालाक बिबट्यासमोर अखेर वन खात्याला नतमस्तक व्हावे लागले आहे.

गेल्यास तीस दिवसांमध्ये वन खात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 50 लाखाहून अधिक पैसे खर्च केले आहेत मात्र बिबट्याला पिंजऱ्यात अडकवणे वन खात्याला जमले नाही
27 ट्रॅप कॅमेरे 8 पिंजरे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास दीडशेहून अधिक वन खात्याचे कर्मचारी पोलीस दलाची मदत 2 हत्ती,विशेष पथक,ट्रांझक्युलर कोंबिंग ऑपरेशन राबवत वनखात्याने राबवली मोहिम राबवली मात्र अद्याप बिबट्या वन खात्याच्या जाळ्यात अडकला नाही.

मंडोळी, बीजगरणी, बाकनूर या परिसरातला बिबट्या आणि गोल्फ कोर्स परिसरात वास्तव्यास असलेला बिबट्या एकच आहे का बेळगावातील बिबट्या तालुक्याच्या पश्चिम भागात वावर करत आहे का? याची आता चर्चा सुरू झाली.Golf course

‘त्या’ 22 शाळा उद्यापासून सुरू -डीडीपीआय

बिबट्याच्या भीतीमुळे खबरदारी म्हणून गेला जवळपास महिनाभर बंद ठेवण्यात आलेल्या बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरातील 22 शाळा उद्या सोमवार दि. 5 सप्टेंबरपासून पुन्हा पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती शिक्षण खात्याचे उपसंचालक (डीडीपीआय) बसवराज नलतवाड यांनी दिली आहे.

बिबट्याच्या वावरामुळे बेळगाव गोल्फ कोर्स मैदानाच्या कांही किलोमीटर परिघातील शहर व ग्रामीण भागात मोडणाऱ्या 22 शाळांना खबरदारीस्तव सुट्टी देण्यात आली होती. पालक व मुलांच्या सुरक्षततेसाठी ही सुट्टी देण्यात आली असली तरी संबंधित शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत होते. आता उद्यापासून सदर शाळा सुरू होणार आहेत. मात्र पालक व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.