गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होत असताना अवघ्या दोन दिवसावर गणरायाचा निरोपाचा सोहळा अर्थात गणेश विसर्जन होणार आहे. शुक्रवारी गणपती विसर्जन असून याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. खडे बाजार येथील पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना खास सूचना केल्या.
बेळगांवची गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.यामुळेविसर्जन मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून शांतता कमिटीची बैठक आयोजित करून सूचना करण्यात आल्या.
नियोजित विसर्जन मार्गावरूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपली मिरवणूक मार्गक्रमण करत त्या ठिकाणी कपिलेश्वर तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी यावेळी केले.
विसर्जन गणरायाच्या गणरायाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीची मार्गाची पाहणी केली होती त्यानुसार संबंधित विभागाला सूचना देखील केल्या होत्या यामुळे आता केवळ दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांनी शांतता कमिटीची बैठक बोलावून विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याबरोबरच वादावादीचे प्रकार घडू नयेत यासाठी विसर्जन मिरवणुकीचा ठरवून दिलेला मार्गच गणेशोत्सव मंडळांनी अवलंबावा असे नमूद केले आहे.
यावेळी मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील गणेश मिरवणुकीचे स्वागत करणार असल्याचे सांगून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी विकास कलघटगी,प्रवीण तेजम,दस्तगीर अलवाडकर,भाऊ किल्लेकर,सुहास चौगुले, गौरव कुलकर्णी,समीउल्ला पठाण आयुब पठाण आदी उपस्थित होते.