भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना रॅबीजला
अटकाव घालण्यासाठी म्हणून पशु संगोपन खात्यातर्फे रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
चन्नम्मानगर येथील दांडिया गार्डन मध्ये रविवारी सकाळी मोफत लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. साधारण 200 हून अधिक श्वानांना रॅबीज प्रतिबंधक लस देण्यात आल्या.संबंधित भटक्या कुत्र्यांबरोबरच संबंधित श्वानांच्या पालकांनी देखील आपल्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस घेतली.
पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रॅबीज सारखा रोग होतो.यामुळे कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना, कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देऊन पशु संगोपन खात्यातर्फे रेबीज ला आळा घालण्यासाठी म्हणून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला असून रेबीज प्रतिबंधक लस वितरित करण्यात आली आहे.
यावेळी मिशन रॅबीज प्रतिबंधक लसीकरण राबविताना डॉ. आनंद पाटील, डॉ. बंटी. गनगरेड्डी, डॉ., शशिधर डॉ. कट्टेनावर, डॉ.हन्नूरकर व पशु संगोपन खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.
लंपी स्किन रोगाच्या पाश्वभूमीवर केवळ जनावरे नव्हे तर इतर पशु प्राणी मानवाला त्या पासून होणाऱ्या संभाव्य धोक्याची खबरदारी म्हणून काळजी घेतली जात आहे.एकूणच पशु संगोपन खाते सतर्क झाले आहे.