Saturday, April 27, 2024

/

डीसी कार्यालयात दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची मागणी

 belgaum

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या वयस्क दिव्यांग व्यक्तींना प्रवेशद्वाराच्या पायऱ्या चढून जाणे अवघड असल्यामुळे त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करावी. तसेच उजव्या अंगाला असलेला कार्यालयात ये-जा करण्याचा रस्ता स्वच्छ ठेवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कामानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) भेटण्यासाठी आज शुक्रवारी एक दिव्यांग इसम जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. सदर कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला तब्बल 20 -25 पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारातील इतक्या पायऱ्या चढून जाणे शक्य नसल्याने संबंधित इसम खालच्या पायरीवरच बसून होता. त्यावेळी तेथे हजर असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी त्या इसमाची विचारपूस केली.

त्यानंतर चौकशी केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका अंगाला वृद्ध अथवा दिव्यांग नागरिकांना ये -जा करण्यासाठी लिफ्टची सोय असल्याचे सांगण्यात आले. ती लिफ्ट कोठे आहे हे पाहण्यासाठी दरेकर गेले असता त्यांना त्या ठिकाणच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर पडलेल्या फुटक्या काचांसह मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निदर्शनास आली.Dc entrance

 belgaum

प्रवेशद्वाराशेजारील कचऱ्याचा डबा प्लास्टिक बाटल्या केरकचऱ्याने तुडुंब भरून वाहत होता. तसेच शेजारीच मोठ्या रान उगवलेला मातीचा ढिगारा, मोडके साहित्य इतस्ततः पडले होते. प्रवेशद्वाराच्या आतील व्हरांड्यात देखील पुस्तकांची रद्दी पडली होती. त्यामुळे लिफ्टपर्यंत जाण्यासाठी चिंचोळा मार्ग शिल्लक राहिला होता.

या सर्व गोष्टींचे आपल्या मोबाईलवर चित्रीकरण करून जागरूक संतोष दरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या वयस्क अपंग अर्थात दिव्यांग व्यक्तींसाठी तातडीने व्हीलचेअरची व्यवस्था केली जावी. तसेच लिफ्टकडील प्रवेशद्वाराच्या ठिकाणी फुटक्या काचा व केरकचरा पसरून प्रतिकूल बनलेला मार्ग जनतेच्या हितासाठी स्वच्छ ठेवावा, अशी मागणी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे केली आहे. आपल्याकडील व्हिडिओ चित्रीकरण दाखवून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधी समस्या त्वरित निकालात काढण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.