Sunday, December 29, 2024

/

शिवचरित्रावर 16 ऑक्टो. रोजी लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धा

 belgaum

संयुक्त छ. श्री शिवाजीनगर बेळगाव येथील शिवभक्त युवक मंडळातर्फे येत्या रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दुसरी गल्ली छ. शिवाजीनगर येथील श्री गणेश मंगल कार्यालय येथे लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मोठा गट हा 17 वर्षावरील स्पर्धकांसाठी असणारा असून या गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5000, 3000, 2000, 1000 आणि 1000 रुपये व प्रमाणपत्र बक्षीसा दाखल दिले जाईल. याखेरीस पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना भेट म्हणून शिवचरित्र देण्यात येईल.

या गटासाठी प्रवेश शुल्क 20 रुपये आहे. लहान गट हा 10 ते 16 वर्षे वयोगटातील मुला -मुलींसाठी मर्यादित असून या गटासाठी प्रवेश मोफत आहे. या गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 3000, 2000, 1500, 1000 व 1000 रुपये व प्रमाणपत्र बक्षीसा दाखल दिले जाईल. याखेरीज पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना शिवचरित्र भेटी दाखल दिले जाईल.

सदर 1 तासाची स्पर्धा मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत घेतली जाईल. स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित 40 प्रश्न देण्यात येतील. यामध्ये 15 पर्यायी उत्तरांचे प्रश्न व 25 एक वाक्यातील उत्तराच्या प्रश्नांचा समावेश असेल. लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर 2022 ही आहे. स्पर्धेत नांव नोंदवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सुहास 7795433797, राहुल 9036866785 किंवा हरीश 9591526518 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.