Friday, May 24, 2024

/

महिलांच्या रोजगारासाठी बेला ब्रिज उपक्रम

 belgaum

महिलांच्या कल्याणार्थ विविध उपक्रम राबवणाऱ्या बेला या समूहातर्फे आता शहरातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्या अनुषंगाने महिला कर्मचाऱ्यांची गरज असलेल्या कंपन्यांना आवाहन करण्यात आले आहे.

बेळगावच्या महिलांचे प्रतिनिधित्व करणारा बेला हा समूह (ग्रुप) म्हणजे एक विशेष महिला गट असून या गटाचे 30000 महिला सदस्य आहेत. बेला समूहाकडून वर्षभर महिलांच्या कल्याणार्थ विविध उपक्रम राबविले जातात.

बेला ब्रिज हा त्यापैकीच एक उपक्रम असून ज्याद्वारे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. थोडक्यात बेला ब्रिज हा आपल्या नावाप्रमाणे कर्मचारी आणि मालक यांच्यातील दुवा साधणारा सेतू असून जो शहरातील महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो.

 belgaum

ज्या कंपन्यांकडे महिलांसाठी त्यांच्या कंपनीत कामाची जागा रिक्त असेल त्यांनी गुगल फॉर्म भरावयाचा आहे. संबंधित कंपनीची गरज लक्षात घेऊन बेला ब्रिज रिक्त असलेल्या संबंधित नोकरीच्या जागे बाबतचे आवाहन व माहिती आपल्या 30000 सदस्य संख्या असलेल्या ग्रुपवर पोस्ट करते.Bela bridge

रोजगाराच्या संधी, नोकरी बाबतचे हे आवाहन बेला ब्रिजच्या ग्रुपवर दर बुधवारी पोस्ट केले जाते. सदर पोस्ट वाचून ग्रुप मधील गरजू लायक उमेदवार नोकरीसाठी थेट कंपनीशी संपर्क साधू शकतात. ही संपूर्णपणे मोफत सेवा असून यासाठी संबंधित कंपनी अथवा उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तेंव्हा बेला ब्रिजचे सहकार्य घेण्यासाठी इच्छुक कंपन्या आपल्याकडील महिलांकरिता नोकरीच्या रिक्त जागांसाठी https://form.gle/pVmvKMLqs3rjamT49 या लिंकवर गुगल फॉर्म भरू शकतात.

बेला ब्रिजचा इमेल एड्रेस [email protected] हा असून अधिक माहितीसाठी 7090710710 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.