Friday, December 20, 2024

/

“बोनं” : खानापूर-नंदगड भागात साजरी होणारी प्रथा!

 belgaum

घरोघरी श्री गणेशाचे आगमन होऊन गणेश पूजन झाल्यावर गणेशाला दाखवलेला नैवेद्य,पंच पक्वांनांचे जेवणात केलेले पदार्थ यातील थोडा थोडा नैवेद्य एकत्रित केला जातो, त्याला बोनं असे संबोधले जाते. श्री गणेश चतुर्थीदिवशी गणपतीला दाखविला जाणारा नैवेद्य हा शेतात शिंपडला जातो. याच प्रथेला बोनं असे म्हणतात.

हे बोनं खानापूर व नंदगड परिसरातील शेतकरी गणेशाचे पूजन झाल्यावर आपल्या बहरलेल्या शेतीत शिंपडलं जातं. नंदगड भागातील शेती ही भातपिकासाठी प्रसिद्ध आहे, कर्नाटक राज्यात नंदगड भाग भातपिक पोसण्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

या भागातील भातपिका बरोबरच ऊस शेतीही गणेश चतुर्थीच्या दरम्यान ऐन बहरात आलेली असते, त्यामुळे या भागातील शेतकरी या बहरात आलेल्या शेतीला श्री गणेशाचे वाहन उंदिरापासून लोम्ब तोडणी होऊन नुकसान होऊ नये, यासाठी श्री गणेशाला दाखवलेल्या नैवेद्याचं ‘बोनं” हे पीक वाचवण्यासाठी शिंपडतो.Bona paddy undari

या व्यतिरिक्त जंगली प्राणी, रोगराई, टोळधाड या पासून पिकांचं नुकसान होऊ नये या धारणेने तसेच श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणूनही शेतात शिंपडला जातो. याच प्रथेला बोनं असे म्हटले जाते. हे बोनं शिंपडल्याने पीकपाणी उत्तम राहते, पिकाला उंदीर लागत नाही, पिकाचे संरक्षण होते अशी शेतकऱ्यांची धारणा आहे.11 rm

केवळ नंदगड नव्हे तर बेळगाव तालुक्यातीलही अनेक गावांतून गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार आणि घरात केलेल्या पदार्थांचे नैवेद्य शेतात शिंपडले जाते पिकं पाणी चांगलं पिकू देत अशी मागणी केली जाते.11 Rohit

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.