Friday, March 29, 2024

/

बेळगुंदी शेतकरी मेळाव्यात रघुनाथ दादांची होणार उपस्थिती

 belgaum

बेळगाव दि २३- आगामी २ एप्रिल रोजी बेळगुंदी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या सह महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत . ए पी एम सी अध्यक्ष निन्गाप्पा जाधव आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर इस्लामपूर येथील राष्ट्रीय शेतकरी परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले असता त्यानी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव दौऱ्याच आमंत्रण दिल आहे .

२ एप्रिल रोजी बेळगुंदी येथे भव्य शेतकरी मेळाव्याच आयोजन केल असून या मेळाव्यात कर्नाटकातील शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा या साठी आंदोलनाची रूपरेषा आणि भू संपादन विरोधातील लढा स्वरूप ठरवील जाणार आहे . बेळगाव शेतकरी संघटनेच्या वतीन या कार्यक्रमाचे आयोजन केल असून या कार्यक्रमास हजारो शेतकरी उपस्थित राहणार आहेत. बेळगुंदी मेळाव्यात ए पी एम सी अध्यक्षपदी निवड झालेल्या निन्गाप्पा जाधव यांचा देखील सत्कार केला जाणार आहे. इस्लामपूर येथील शेतकरी परिषदेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना बेळगावातील भू संपादना विषयी माहिती देण्यात आली त्यावेळी कडू यांनी पुढील वेळी बेळगावातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात आपण सामील होऊ अस आश्वसन दिल .    raghunat dada patil bgm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.