‘जय भवानी’ ‘जय शिवाजी’च्या गजरात दौडचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील दौड मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे शिवचरित्र आणि शिवजन्माचा इतिहास तरुणाई पुढे सादर होत आहे.
बेनकनहळी गावात देखील शुक्रवारी भव्य अशी दौड निघाली आणि यामुळे चैतन्यमय आणि भगवेमय वातावरण अनुभवायला मिळाले.
रामघाट रोड येथून सुरू झालेली दौड लक्ष्मी चौक येथे समाप्त झाली. पहाटेच्या वेळी प्रत्येकाच्या मुखी असणारा शिवनामाचा गजर आणि प्रसन्न वातावरण यामुळे गावकऱ्यांनी दौडीचा प्रत्यक्ष उत्साह अनुभवला.
प्रारंभी गावाचे पंचमंडळी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत दौड निघाली.प्रामुख्याने 200 हून अधिक मुली देखील दौड मध्ये सहभागी झाल्या होत्या.
प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक ईश्वर पाटील यांनी दौड आणि दसरा उत्सव यासंदर्भाचा इतिहास सादर केला याबरोबरच शालेय विद्यार्थिनीने संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली यामुळे बँका नळी गावात निघालेली हजारोंच्या संख्येने धारकरी उपस्थित झाले होते.