बेळगावमध्ये लागोपाठ झालेल्या दोन अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आणि अनेक रस्त्यांवर तात्काळ गतिरोधक बसविण्यात आले. मात्र आली लहर आणि केला कहर या उक्तीप्रमाणे अशास्त्रीय दृष्ट्या बसवण्यात आलेले गतिरोधक असून अडचण नसून खोळंबा बनले आहेत.परिणामी केवळ 4 ते 5 दिवसात बसवण्यात आलेले गतिरोधक दुरुस्त करण्याचे काम करण्यात येत आहे.
कॅम्प खानापूर रोड येथील अपघातानंतर या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्यात आले. वाहनाच्या वेगामुळे एका शालेय विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जीव गेलेला होता.यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तसेच वाहनांचा वेग कमी करण्यासाठी महत्वपूर्ण काम करणारे गतिरोधक बसविण्यात आले.
मात्र शास्त्रीय दृष्ट्या गतिरोधकांची उंची तसेच दोन गतिरोधकांमधील अंतर याचा कोणताच विचार न करता बसविण्यात आलेले गतिरोधक गैरसोयीचे ठरत असल्यामुळे आता गतिरोधक दुरुस्तीचे काम केले जात आहे.
गतिरोधक शास्त्रीय नव्हते आणि नियमानुसार उंची नव्हती याची दखल माध्यमानी घेतली होती विशेषतः डिजिटल मीडियाने हा मुद्दा लावून धरला होता त्यानंतर त्यांची दखल वृत्तपत्रांनी देखील घेतली होती त्यानंतर गुरुवारी रात्री कॅम्प पेट्रोल बंक जवळील गतिरोधकाची उंची कमी करण्यात आली आहे.
गतिरोधकाभावी अनेकांचे अपघात आणि जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली होती. यामुळे प्रशासनाने गतिरोधक बसवून तात्पुरती का होईना अपघाताची मालिका थांबावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे नागरिकांना दाखवून दिले होते.मात्र सदर गतिरोधक अडचणीचे ठरत असल्यामुळे गतिरोधकांचा मूळ हेतूच दुर्लक्षित राहिला आहे. परिणामी बसविलेले गतिरोधक काढून पुन्हा दुरुस्ती करण्याचे काम केले जात आहे.अ