रथ गल्ली जुने बेळगाव येथे नातेवाईकांच्या घरी आलेली तरुणी बाहेर जाते असे सांगून बेपत्ता झाली आहे. बेंगळुरू येथील आणेकल तालुक्यातील जिगणी गावात राहणारी ज्योती हिक्कडी, (वय २०)असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे.
सदर तरुणीचे वडील श्रीशैल हिक्कडी विजापूर जिल्ह्यातील मादापट्टण येथे राहतात. बेळगावच्या वडगाव येथील रयत गल्ली येथे पंधरवड्यापूर्वी नातेवाईकाच्या घरी आले असता सदर युवती गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती तरुणीच्या वडिलांनी दिली आहे.
याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तरुणीबद्दल कोणती माहिती मिळाल्यास अथवा ही तरुणी कुठेही आढळल्यास पोलिसांना माहिती देण्यात यावी, असे आवाहन शहापूर पोलिसांनी केले आहे.