75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त हलगा येथील सुवर्ण सौध इमारतीला केलेली तिरंगामय विद्युत रोषणाई पहाण्यासाठी बेळगाव शहर परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
आकर्षक अशी तिरंगी विद्युत रोषणाई, समोरील बाजुने लेझर लायटिंग यामुळे सुवर्णसौधसह आसपासचा परिसर देखील उजळून निघाला होता. यावेळी या परीसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सोमवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्वच शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली होत. यंदा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त 3 दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या तीन दिवसापासून हलगा येथील सुवर्ण सौधला उत्कृष्ट सजावट करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या रोषणाईचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असून सदर सजावट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
त्यामुळे सोमवारी सायंकाळी महामार्गावर वाहनांची गर्दी ठिकाणी झाली होती.
विद्युत रोषणाई पाहण्यासाठी झाली होती सुवर्ण सौध समोर गर्दी-ट्रॅफिक जाम pic.twitter.com/8Qaq6Lbv1n
— Belgaumlive (@belgaumlive) August 16, 2022