स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा ध्वज लावून साजरा करण्यात येत आहे.मागील दोन दिवसापासून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा ध्वज मानाने फडकताना दिसत आहे. मात्र 15 ऑगस्ट रोजी सदर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी घरोघरी लावण्यात आलेले तिरंगा ध्वज सायंकाळी उतरवण्यात आले. भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत प्रत्येक घरावर लावण्यात आलेला ध्वज नियमाप्रमाणे उतरविण्यात आला.
भारत देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दि 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाच्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यात यावा अशी जागृती करण्यात आली होती त्यानुसार प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविला होता
यामुळे मागील तीन दिवसापासून प्रत्येकाच्या घरावर दिमाखात ध्वज फडकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले .
ध्वज लावण्याबाबतचे व ध्वज उतरवण्याबाबतचे नियम सोशल मीडिया तसेच वृत्तपत्राच्या माध्यमातून देण्यात आले होते.त्यानुसार तिरंगा ध्वजाचा मान राखत ध्वज लावण्या बरोबरच सोमवारी सायंकाळी ध्वज उतरविण्यात आला. आणि दि. 13 ऑगस्ट रोजी सुरू झालेली हर घर तिरंगा मोहीम 15 ऑगस्ट रोजी पूर्ण झाली.
दरवर्षी सार्वजनिक स्थळे तसेच शाळा मंदिरे अशा विविध ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविण्यात येतो. मात्र यंदा प्रत्येकाच्या घरोघरी फडकलेला तिरंगा ध्वजामुळे स्वातंत्र्य उत्सवाला एक वेगळाच उत्साह दिसून आला होता.
प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा ध्वज फडाकताना दिसत होता. याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता.प्रत्येकाच्या डीपी तसेच स्टेटसवर देखील मागील तीन दिवसापासून तिरंगा ध्वज आणि घरावर फडकणारा ध्वज असे विविध फोटो पाहायला मिळत होते.यामुळे सोशल मीडियावर सुरू असणारा स्वातंत्र्याचा उत्साह देखील द्विगुणित झाला होता.