बेळगाव जिल्हा तायक्वांडो क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी सूप्रसिद्ध असलेल्या भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव याना वर्ल्ड स्पोर्ट्स मार्शल आर्ट्स कौन्सिल यूएसए, आयोजित वर्ल्ड स्पोर्ट स्टार अवॉर्ड्स २०२२ मध्ये ‘बेस्ट कोच इन दी फिल्ड ऑफ तायक्वांडो’ असं पुरस्कृत करून इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम यु एस ए मध्ये मान्यवरांचा नाव समावेश झाला आहे.
कोलकत्ता रेंजर्स क्लब मध्ये २२ मे २०२२ आयोजित झालेला असून विश्वभर युद्ध कलेचा क्रीडा विभागातील अतुलनीय कामगिरी केलेल्या लोकांना गौरविण्यात आले.
तसेच तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाचे ४६वा संस्थापन दिवसाचं निमित्त आयोजित ‘तायक्वांडो हॉल ऑफ फेम इंडिया’ चे तिसरी आवृत्ती ०२ ऑगस्ट २०२२ ला लखनऊ येथे पार पडला असून देशभरातील तायक्वांडो खेळाचा व क्रीडापटूंना विकास साठी राबविलेल्या १० वरिष्ठ प्रशिक्षकाना सन्मानित करण्यात आल होत.
त्या दहा वरिष्ठ प्रशिक्षकात बेळगावचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव यांनी शामिल असून यांना ‘मास्टर इन तायक्वांडो’ चे डिप्लोमा सन्मान भारतीय तायक्वांडो चे पितामह व तायक्वानडो फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक ग्रँडमास्टर डॉक्टर जिम्मी जगतानी यांचे द्वारा प्राप्त झालाआहे . बेळगावच्या श्रीपाद राव यांचे नाव तायक्वांडो हाल ऑफ फेम इंडिया मध्ये दाखल करण्यात आले आहे.
नुकताच दोन अतुलनीय गौरव प्राप्त करून देश व राज्याचे नाव वाढवल्याबद्दल भारतीय वायुसेनेच्या एअरमन ट्रेनिंग स्कूल सांब्रा चे वायु ऑफिसर कमांडींग एअर कमांडर एस श्रीधर यांनी श्री राव याचे प्रशंसा करून प्रमाण पत्र हस्तांतरण केले.
यावेळी बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट प्रभाकर शेडबळे व सचिव महादेव मुतनाळे यांनीही आनंद व्यक्त केला आहे.