कॅम्प फिश मार्केटनजीक खानापूर रोडवर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या तिहेरी अपघातात एक शालेय विद्यार्थी ठार झाल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवारी सकाळी घडली. अपघातानंतर एकच गर्दी झाल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
या अपघातात एक विध्यार्थ्यांचा मृत्य तर दोन जखमी झाले आहेत मयत विध्यार्थी हा इस्लामिया स्कूलमध्ये मध्ये शिकत होता अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
आपल्या नातलगासोबत स्कुटी (क्र. के 22 इएस 8508) वरून जात असताना नियंत्रण सुटलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे ट्रक खाली सापडून आयुष घटनास्थळीच गतप्राण झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने आज सकाळी 8:45 च्या सुमारास उपरोक्त अपघात घडला. ट्रकने धडक दिल्यामुळे एका कारचेही नुकसान झाले आहे.
अपघात घडतात बघ्यांची एकच गर्दी उसळली. गर्दीतील काहींनी ट्रक चालकालाबाहेर खेचून चांगला चोप दिला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे कॅम्प येथील खानापूर रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सदर घटनेची रहदारी दक्षिण विभागात नोंद झाली असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
ट्रकच्या धडकेत विद्यार्थी ठार होण्याची आठवड्यामध्ये ही दुसरी घटना आहे. त्यामुळे अवजड वाहनांना बेळगाव शहरात प्रवेश बंदीची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. अवजड वाहनांची संख्या वाढल्यानेच असे अपघात घडत आहेत. यासाठी अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी अशी जोरदार मागणी सध्या या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दोनच दिवसांपूर्वी भरतेस पी. यू. कॉलेजची विद्यार्थिनी सादिया पालेगार हिचा फोर्ट रोड येथील अपघातात ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आज त्यात ज्योती सेंट्रलच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भर पडली आहे.