बेळगावच्या कन्येचा समावेश असलेल्या भारतीय फ़ुटबॉल संघाने अमेरिका डेट्राईस मध्ये झालेल्या स्पेशल ऑलम्पिक युनिफाईड कप मध्ये कांस्य पदक पटकावले आहे त्यामळे बेळगावच्या तरुण होतकरू फुटबॉल खेळाडूचे कौतुक होत आहे.
संभाजी गल्ली महाद्वार रोड बेळगाव येथील धनश्री कदम हिचा १७ वर्षाखालील महिलांच्या भारतीय फुटबॉल टीम मध्ये समावेश करण्यात आला होता.
१४ जणींच्या भारतीय चमूत खेळणारी धनश्री ही केवळ बेळगाव नव्हे तर कर्नाटकातून एकटीन होती त्यामुळे सतरा वर्ष खालील भारतीय संघाने स्पेशल ऑलम्पिक मध्ये मिळवलेल्या कांस्य पदकात बेळगावचाही वाटा आहे.भारतीय फ़ुटबाँल टीम ने श्रीलंकेचा १०- ० ने पराभव करत हे कांस्य पदक मिळवले असून दुबई ने रौप्य पदकाची कमाई केली आहे.
भारतीय संघात स्थान मिळेपर्यंत मजल मारण्यासाठी धनश्री कदम हिला फ़ुटबाँल कोच मानस नायक हिचे मार्गदर्शन लाभले आहे.महाद्वार रोड संभाजी गल्ली मधील गरीब कुटुंबातील धनश्रीला अनेकांनी मदत केली होती त्यामुळेच या स्पर्धेत सहभागी झाली होती टीम इंडियाची रेड जर्सी परिधान करू शकली होती.
तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी विद्यानिकेतन शाळेत झाले असून सध्या ती लिंगराज कॉलेजे मध्ये बारावीत कॉमर्स मध्ये शिकत आहे. आगामी ९ आगष्ट रोजी हा संघ मायदेशी परतत असून ११ रोजी धनश्री बेळगावला यायची शक्यता आहे. स्पेशल ऑलम्पिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत बेळगावचे नाव उंचावणाऱ्या या महिला खेळाडूचे टीम बेळगाव live कडूनही अभिनंदन ..