गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव या संस्थेतर्फे सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवी तसेच इयत्ता दहावी या वर्गात शिकत असलेल्या सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा स्पर्धा तसेच इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांसाठी कवी द. रा. किल्लेकर यांच्या स्मरणार्थ हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता मराठी विद्यानिकेतन येथे या स्पर्धा घेण्यात येणार आहेत,. इयत्ता सातवी ,इयत्ता नववीच्या परीक्षेत मराठी विषयात किंवा A किंवा A+ श्रेणी मिळवलेले विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र ठरतील.
या स्पर्धेत इयत्ता आठवी साठी प्रथम क्रमांकासाठी रुपये 1000 व मानचिन्ह, द्वितीय पुरस्कार रुपये 700 व मानचिन्ह,तृतीय पुरस्कार रुपये 500 व मानचिन्ह तर तीन उत्तेजनार्थ पुरस्कारांसाठी रुपये 200 तसेच इयत्ता दहावी साठी प्रथम पुरस्कार रुपये 1500 व मानचिन्ह, द्वितीय पुरस्कार रुपये 1000 व मानचिन्ह, तृतीय पुरस्कार रुपये 700 व मानचिन्ह, तसेच तीन उत्तेजनार्थ पुरस्कारांसाठी रुपये 300 असे बक्षिसांचे स्वरूप आहे. या स्पर्धेसाठी व्याकरण, अलंकार, वृत्त, समास, प्रयोग, काळ, वाक्प्रचार, संधी, निबंध लेखन, कल्पनाविस्ता,र पत्र लेखन, उताऱ्यावरील प्रश्न, कवितेचा सारांश असे विषय देण्यात आले आहेत. इयत्ता सातवी पर्यंत च्या अभ्यासक्रमावर आधारित आठवीसाठी तर इयत्ता नववी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित दहावी साठी परीक्षा होईल.
कवी द. रा. किल्लेकर यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणाऱ्या हस्ताक्षर स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गट ठरविण्यात आले असून आपल्या शाळेतून दोन्ही गटातील निवडक तीन विद्यार्थ्यांची नावे संस्थेकडे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हस्ताक्षर स्पर्धा परीक्षेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम पुरस्कार रुपये 700 व मानचिन्ह, द्वितीय पुरस्कार रुपये 500 व मानचिन्ह, तृतीय पुरस्कार रुपये 300 व मानचिन्ह तर उत्तेजनार्थ पुरस्कार तीन विभागात रुपये २०० याचप्रमाणे इयत्ता आठवी ते दहावी साठी प्रथम पुरस्कार रुपये 1000 व मानचिन्ह, द्वितीय पुरस्कार रुपये 700 व मानचिन्ह, तृतीय पुरस्कार रुपये 500 व मानचिन्ह, तर तीन उत्तेजनार्थ पुरस्कार रुपये 300 असे या बक्षिसांचे स्वरूप आहे .
या स्पर्धा परीक्षेत तसेच हस्ताक्षर स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार व मानचिन्ह देऊन त्यांना व स्पर्धा परीक्षेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांना 2022 च्या बाल साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर आणि सचिव सुभाष ओऊळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.