Friday, May 24, 2024

/

स्वतःचे दुःख विसरून आमदार समाज सेवेत

 belgaum

कॅम्प येथे आज सकाळी अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पितृशोक झालेला असतानाही स्वतःचे दुःख विसरून आमदार ॲड. अनिल बेनके यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांची भेट घेतली तसेच मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

अवजड वाहनाने विद्यार्थ्याला चिरडल्याने त्या भागातले नागरिक आणि बेळगावकर जनता संतप्त झाली आहे. अपघातानंतर चिडलेल्या स्थानिक लोकांनी रास्ता रोको करत निदर्शने केली.बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बनके यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. अद्याप वडिलांचे अकरा दिवसांचे सुतक संपलेले नाही. श्राद्धविधी झालेला नाही, असे असतानाही स्वतःचे दुःख विसरुन जनसेवेचे लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे आपले कार्य आमदार ॲड. अनिल बनके यांनी सुरूच ठेवले आहे.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी, भाजप नेते किरण जाधव, शंकरगौडा पाटील उद्योजक गजानन मिसाळे, शिवजयंती चित्ररथ मिरवणूक महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, नगरसेविका सारिका पाटील, महिला संघ अध्यक्षा प्रियंका कलघटकर, प्रज्ञा शिंदे आदी मंडळी आज सकाळी आमदार बेनके यांच्या घरी सांत्वनासाठी गेली होती.Benke visit accident spot

 belgaum

सांत्वनासाठी येणाऱ्या मंडळींच्या भेटीमधून वेळ काढून आमदार बेनके त्यांना भेटण्यास येणाऱ्या नागरिकांच्या समस्याही जाणून घेत होते. यावेळी कॅम्प येथील अपघाताची माहिती मिळताच आमदारांनी तडक कॅम्प गाठून संतप्त नागरिकांकडून अपघाताची माहिती जाणून घेतली.

तसेच मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याबरोबरच मृतदेह ठेवलेल्या शवागारालाही भेट दिली. या पद्धतीने स्वतःच्या वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून लोकप्रतिनिधी या नात्याने आपले कर्तव्य चोख बजावणारे आमदार ॲड. अनिल बेनके मतदारसंघात कौतुकाचा विषय झाले आहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.