प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या असल्या तरी त्या शिक्षणाचा दर्जा गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत विद्यार्थ्यांना केवळ ढकलले जाते.
शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या या आणि याच्या संलग्न असलेल्या गैरप्रकारांवर ‘कॉपी’ हि शॉर्टकट गोष्ट विद्यार्थ्यांना जवळची वाटत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात कॉपी या प्रकारचे चित्रण दाखवण्यात आले. आधुनिक काळातील साधनांचा वापर करून परीक्षित कॉपी करायची पद्धत ‘मुन्नाभाई’ मध्ये दाखविण्यात आली.
कानाला इअरफोन लावून मेडिकलची परीक्षा देणाऱ्या मुन्नाभाईच्या कॉपी प्रकारची कॉपी अनेकांनी आजवर केली आहे. असाच एक प्रत्यक्षातील नवा कोरा मुन्नाभाई बेळगावमध्ये सापडला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक पोलीस टाऊन येथे बुधवारी केपीटीसीएल कनिष्ठ सहाय्यक परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेदरम्यान कॉपी करतेवेळी एक मुन्नाभाई सापडला आहे. स्मार्ट वॉच च्या माध्यमातून कॉपी करणारा हा मुन्नाभाई पोलिसांच्या अटकेत आला आहे. गोकाक पोलीस टाऊन येथे सुरु असलेल्या या परीक्षेत ६०० पदांसाठी ३ लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. या परीक्षेदरम्यान झालेल्या प्रकारानंतर दोन स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
अलीकडेच कर्नाटकात पोलीस परीक्षेत असाच प्रकार पुढे आला. या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारानंतर कित्येक दिवस झालेल्या प्रकारची पडताळणी होत गेली. हे उदाहरण ताजेतवाने असतानाच पुन्हा एक गैरप्रकार पुढे आला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण्याची खरी इच्छा आहे ते या शिक्षण व्यवस्थेच्या दिव्यात अडकले आहेत तर दुसरीकडे शाळेत प्रामाणिक ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षकही या चक्रव्यूहात अडकले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना यशाचा शॉर्टकट हवा आहे मात्र यामुळे इतर विद्यार्थ्यांची सचोटी अन्यायात अडकत असल्याचे चित्र दिसत आहे.