हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात तिरंगा ध्वजांची विक्री होत आहे सध्या प्लास्टिक विक्रीवर बंदी आहे त्यामुळे विक्री होत असलेले प्लास्टिकचे ध्वज,पताका फरफऱ्याना बंदी घालावी अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी यांनी केली.बुधवारी मनपा सभागृहात स्वातंत्र्यदिन स्वागत समितीची बैठक झाली त्या बैठकीत कलघटगी यांनी ही मागणी केली आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी होते.शहरांत काही जणाकडून 25 रुपयांना ध्वज विकले जात आहेत ते दुय्यम दर्जाचे आहेत ती विक्री बंद करा,आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्तम दर्जाच्या ध्वजांची विक्री व्हावी अशीही मागणी त्यांनी मनपा आयुक्तांकडे केली.
एकूणच ध्वज विक्री बाबत लक्ष घाला चांगले ध्वज विकले जावे यासाठी मनपाने पुढाकार घ्यावा आणि मनपा कर्मचाऱ्यांना शहरात प्लास्टिक विक्री बंद करून कापडी उत्तम दर्जाचे ध्वज विक्री करा अश्या सूचना दिल्या जाव्यात व जनता उत्साहाने हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होत आहे यासाठी सरकारी यंत्रणांनी योग्य व्यवस्थित असलेले ध्वज विक्री करावे अशीही मागणी कलघटगी यांनी केली.
मनपाच्या बैठकीवेळी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी बैठकीत स्वागत प्रास्तविक केले.यावेळी श्रीनिवास ताळुकर यांनीही सूचना मांडल्या.
हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करा: जिल्हाधिकारी
हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय इमारती, अंगणवाडी व पंचायत इमारतींवर दररोज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करावे. ध्वज प्रत्येक दिवशी सूर्यास्तापूर्वी खाली उतरवावा.
13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 15 ऑगस्ट रोजी सूर्यास्तापर्यंत जिल्हाभरातील सर्व घरांवर दिवस-रात्र ध्वजारोहण करता येईल. 15 ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरवावा, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील पाटील यांनी म्हटले आहे.सूचनांचे काटेकोर पालन करून जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.
Agreed for all points. It is 100℅correct.