जोरदार पावसामुळे घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे नुकसान झालेल्या भागांचा लवकरात लवकर सर्वे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हा पंचायत कार्यालयात बैठक बोलावली होती. सदर बैठकीत खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन यांना धारेवर धरण्यात आले.
खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन यांना जाब विचारत पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी तुम्हाला सरळ भाषा येते की नाही, अगोदर घर पडलेल्यांना नुकसान भरपाई द्या आणि जास्त बोलू नका” या शब्दात त्यांची झाडाझडती घेतली.
कुणीही राहत नसलेलं घर कोसळलेल्या घराला नुकसान भरपाई न दिल्याने योग्य मदत नुकसान भरपाईची न दिल्याने संताप झालेल्या पालकमंत्र्यांनी प्रवीण जैन त्यांना धारेवर धरले.
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि परिस्थिती नियंत्रणात राहावी या उद्देशाने तपालकमंत्र्यांनी पूरस्थितीचा आढावा घेत सर्व भागातील परिस्थिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली .पालकमंत्री गोविंद कारजोळ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एम बी बोरिंग,जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील आणि जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी दर्शन यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची पूरग्रस्त आढावा बैठक घेण्यात आली.
यासाठी बैठक…..
बळळारी नाल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यावर कायमस्वरूपी तोडगा करण्याच्या उद्देशाने मंगळवार दि. 16 ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात येणार आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बळळारी संदर्भात अधिकार्यांची बैठक बोलावली आहे. सदर बैठकीत आवश्यक परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ नाल्याची खुदाई तसेच इतर समस्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.