काय बेळगावचा पाऊस….काय बिबट्या…
काय सुट्ट्या… ओके मध्ये आहे सगळं…
असे विनोदी वाक्य सध्या व्हाट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरताना दिसत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर होत असताना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला चे आमदार शहाजी पाटील यांचा फेमस झालेला हा डायलॉग अजूनही सगळ्यांची भुरळ घालताना दिसत आहे.
प्रामुख्याने यामधील विनोदाचा भाग सोडला तर या पाठीमागचे गांभीर्य विचारात घेणे गरजेचे आहे.पाऊस असेल किंवा बिबट्या असेल मात्र सुट्ट्या या शाळांनाच आहेत यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवरच होणार होणार आहे.
मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना कोरोनामुळे शाळेत जाताच आले नाही परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.यावर्षी लवकर शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र पावसाचा जोर वाढत चालल्याने मागील पंधरवड्यात तीन दिवस तर या आठवड्यात एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
यामुळे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साठून सुट्टी मिळेल का या ऊक्ती प्रमाणे विद्यार्थ्यांना पावसाची सुट्टी मिळाली परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.
पावसाचे प्रमाण कमी होत असतानाच बिबट्याचे आगमन झाले असल्याने पुन्हा शाळा बंद झाल्या आहेत. बेळगाव शहर आणि तालुक्यातील एकूण 22 शाळा सुट्टी देण्यात आले असून परिणामी शैक्षणिक वाटचालीवर होणारा परिणाम गांभीर्याने विचारात घेणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच निश्चित करण्यात येते सदर वेळापत्रकात ठराविक सुट्ट्या तसेच कामकाजाचे दिवस देखील नमूद केले जातात मात्र सातत्याने निर्माण होत चाललेली परिस्थिती आणि यामुळे होणारा शैक्षणिक वाटचालीवरील परिणाम पाहता सदर बाब गांभीर्याने विचारात घ्यावी लागणार आहे.
विद्यार्थी प्रामुख्याने निसर्गाच्या माध्यमातून अधिकाधिक शिक्षण घेतात. मात्र परिस्थिती पाहता निसर्गाशी मिळते जुळते घेण्याची स्थितीच राहिली सिमेंटच्या सिमेंटच्या जंगलांनी पाऊस असेल किंवा बिबट्या याचा परिणाम मानवी जीवनावर होत असून परिणामी निसर्गातून शिक्षण ही संकल्पना आता दुर्लक्षित आणि दुर्मिळ झाली आहे. यामुळे विनोदाने म्हटले जाणारे वाक्य काय पाऊस,काय बिबट्या काय सुट्ट्या ओके मध्ये आहे सगळं या वाक्याचा अर्थ अधोरेखित होत आहे. शिक्षण विभाग आणि शाळा यांनी याबाबत विचारमंथन करणे आवश्यक बनले आहे.