पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला बैठकीत सहभागी होण्यासाठी पालकमंत्री गोविंद कारजोळ बुधवारी बेळगाव होते त्यादरम्यान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी त्यांची भेट घेऊन मिळणारी नाल्या संदर्भात मागणी केली आहे
बळळारी नाल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यावर कायमस्वरूपी तोडगा करावा यासाठी शेतकरी संघनेतर्फे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांना निवेदन देण्यात आले. नाल्याला येणारा पूर आणि यामुळे होणारे शेतीचे नुकसान यामुळे शेती करणे परवडत नसून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी करत शेतकरी संघटनेतर्फे नारायण सावंत तसेच सुनील जाधव व संघटनेचे इतर पदाधिकारी यांच्यातर्फे सदर निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात नाल्यामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली जाता असून परिणामी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिकाचे नुकसान होत असल्यामुळे पीक पाण्याखाली गेल्यास पुन्हा एकदा लागण करावी लागत आहे.यामुळे याचा कोणताच लाभ शेतकऱ्यांना होत नसून शेती करणे कठीण बनले आहे .याकरिता नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात लावणे आवश्यक आहे.
यासाठी नाल्याचे रुंदीकरण असो अथवा नाल्याची खुदाई तसेच वाढलेली जलपर्णी याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी शेती करताना शेतीमध्ये घालण्यात येणारे भांडवल देखील निघणे कठीण झाले आहे.यासाठी प्रत्येक एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील यावेळी निवेदनात करण्यात आली आहे.
नाल्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच कठीण होत चालला आहे. दरवर्षी हमखास नाल्याला पूर येतो आणि सर्व शेतजमीन पाण्याखाली जाते. याबाबत प्रशासनाकडे मागणी करून तात्पुरती परिस्थिती निवळली जाते.यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा तोच प्रश्न ऐरणीवर येतो.यासाठी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करत शेतकरी संघटनेने उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे मागणी केली आहे.शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात जोतिबा दौलतकर अप्पाजी चौगुले देखील उपस्थित होते.