भारतात शिवमंदिरे असलेल्या काही ठिकाणी कावडीने पाणी आणून शिवलिंगास अभिषेक करण्यात येतो. कावडीच्या माध्यमातून आणलेल्या पाण्याचा शिवलिंगाला अभिषेक करण्याचा उत्सव अनेक ठिकाणी साजरा होतो. महाराष्ट्रातील राजापूर येथील शंकरेश्वर मंदिर, शिखर शिंगणापूर, अकोल्यातील राजराजेश्वर मंदिर, उस्मानाबाद येथील भैरवनाथ मंदिर, आसोला येथील संत सोहमनाथ महाराज मंदिर, तसेच मध्यप्रदेश, उत्तरांचल प्रदेश, हरिद्वार, राजस्थान, झारखंड, सुलतान गंज अशा अनेक ठिकाणी आणि विशेषतः उत्तर काशीत हि कावड यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरी होते.
बेळगावमध्ये प्रथमच कावड यात्रेच्या माध्यमातून उत्तर काशी येथील गंगेचे पाणी आणून श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर देवस्थानातील शिवलिंगाला आज अभिषेक घालण्यात आला आहे. अमेय किरण निपाणीकर या १४ वर्षाच्या मुलाने आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या आईच्या आरोग्यासाठी कॅम्प ते दक्षिण काशी असा प्रवास करत कावड यात्रेने गंगाजल मंदिरात आणले.यावेळी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते किरण निपाणीकर,मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी विशेष पूजेत सहभाग दर्शवला होता.
बेळगावमध्ये प्रथमच झालेल्या या कावड यात्रेचे स्वागत मंदिर ट्रस्ट कमिटीने केले. पंडित नागराज आणि इतर स्वयंसेवकांनी कावड यात्रेचे स्वागत करत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शिवलिंगाला रुद्राभिषेक घातला.
श्रावण महिना हा हिंदू धर्मियांचा पवित्र महिना मानला जातो. तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराची उपासना करणे हे पवित्र मानले जाते . याच कालावधीत कोट्यवधी लोक हरिद्वार, गंगोत्रीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन तेथील पाणी कावड च्या माध्यमातून आणून शिवलिंगाला अभिषेक घालतात. कित्येक भाविक हि यात्रा पायीच करतात.
पौराणिक कथेनुसार अमृत कलश मिळविण्यासाठी समुद्रमंथनाच्या १४ रत्ने प्राप्त झाली त्यात विषही उत्पन्न्न झाले होते. हे विष कोणत्याही देवांनी पिण्यास सहमती दर्शविली नाही मात्र भगवान शंकराने ते विष प्यायले मात्र ते त्यांच्या घशातून खाली उतरले नसल्याचे भगवान शंकराचा गळा निळा झाला आणि यावरूनच त्यांना नीलकंठ असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. भगवान शंकराचा रावण हा भक्त होता. रावण नेहमी शंकराला जलाभिषेक करत असे आणि यामुळे भगवान शंकराला विषाच्या दहापासून आराम मिळत असे… शिवाय असेही मानले जाते कि एखाद्या भक्ताने खऱ्या भक्तीने शिवलिंगावर जलार्पण केले तर शंकराचा वरदहस्त प्राप्त होतो… या पौराणिक कथा आणि आख्यायिकांमुळे आज अनेक भागात कावड यात्रा काढली जाते.
‘कावड’ हे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोऱ्या बांधून त्याखाली वाहून न्यायच्या वस्तू ठेवलेली शिंकाळी असलेले पारंपारिक भारतीय साधन आहे. भारतात शिवमंदिरे असलेल्या अनेक ठिकाणी कावडीने पाणी आणून शिवलिंगास ‘अभिषेक’ करण्याचा उत्सव साजरा केला जातो. गंगा नदीचे पाणी कावडीने नेऊन रामेश्वरलाअभिषेक करण्याचीही परंपरा होती.
गंगेचे पाणी इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या कावड विषयक परंपरांना अहिल्याबाई होळकरांनी आश्रय दिला होता. हीच कावड यात्रा आज बेळगावमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली असून गंगेच्या पाण्याने आज दक्षिण काशीतील श्री कपिलनाथांवर रुद्राभिषेक करण्यात आला.
बेळगावात पहिल्यांदाचं'दक्षिण काशीत कांवड यात्रा'-पहिल्या श्रावण सोमवार निमित्त आयोजन@belgaumlive
@kanwadyatra
@DakshinKashiBelgaum
@KapileshwarTemple pic.twitter.com/UPQ3pd18cH— Belgaumlive (@belgaumlive) August 1, 2022