अरे अरे माणसा तुझं असं कसं वागणं|
घर करतोस स्वच्छ गाव करतोस घाणं|
आपल्याच हातानं काढतोयस खड्डा।
कवा यायचं तुला दुनियादारीचा गाणं।
घरचा कचरा काढून गावभर फेकणाऱ्या लोकांनी आपलं गावं स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे केवळ प्रशासनाला दोष ब देता आपणही आपली जबाबदारी ओळखायला हवी.वेळोवेळी रस्त्यावरचे खड्डे, तुंबलेले नाले किंवा गटारी किंवा प्रशासकीय हलगर्जीपणा यांच्यावर टीका करणाऱ्यानी आपलं वागणं सुधारायला हवा .
स्मार्ट सिटी केवळ प्रशासनान प्रयत्नाने बनणार नाही तर यासाठी नागरिकांनीही आपले कर्तव्य बजावणे गरजेचे आहे.कचरा नाल्यात न फेकता कचरा कुंडीत टाका किंवा सकाळी येणाऱ्या मनपाच्या गाडीत द्या. आजच्या घडीला कचरा साक्षरता अभियान हाती घेण्याची गरज आहे.
गटारी आणि नाले या शहराच्या धमन्या आहेत ज्या मोकळ्या आणि स्वच्छ राहिल्या तरच शहराचे आरोग्य निरोगी राहिलं नाही तर शहरालाच हार्ट अटक येईल.
पिरनवाडी येथील नाल्यात कचरा टाकणाऱ्या युवकांना सामाजिक कार्यकर्ते अॅलन मोरे यांनी अडवून जाब विचारला पण त्या कचरा पिरनवाडी नाल्यात फेकणाऱ्याची ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. नाल्यात बाजूनी शासनाने डस्ट बिन ठेवावी असे उचलली जीभ की लावली टाळ्याला असे या युवकांचे वक्तव्य बेताल होते.
घरचा कचरा नाल्यात… पिरनवाडी येथील बेताल युवक नाल्यात कचरा फेकताना कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/IeiQOD17xA
— Belgaumlive (@belgaumlive) August 14, 2022