स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मात्र आता खरी जबाबदारी वाढली आहे.कारण मागील तीन दिवसापासून प्रत्येकाच्या घरावर फडकविण्यात आलेला तिरंगा ध्वज उतरविण्याबरोबरच तो व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी महत्त्वाची असून प्रत्येकाने ती कटाक्षाने पाळावी. तिरंगा चा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही ही जबादारी महत्वाची आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यामुळे हर घर तिरंगा च्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकविण्यात आला.दि13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाच्या घरावर तिरंगा मानाने फडकत होता. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी तिरंगा उतरवणे गरजेचे होते.
मात्र अजूनही ठिकठिकाणी तिरंगा फडकताना दिसत असून अनावधानाने तिरंगा उतरवणे राहून गेले असले तरीही तो उतरवणे गरजेचे आहे.तो तिरंगा उतरविण्याबरोबरच तो खाली पडू नये याची खबरदारी देखील घेणे गरजेचे आहे.
तिरंग्याचा अपमान होऊ नये यासाठी प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरावर लावलेले तिरंगा उतरवावा आणि तो व्यवस्थित ठेवावा.
सोशल मीडियद्वारे ज्या प्रमाणे जागृती करण्यात येत होती त्याच पद्धतीने 16 ऑगस्ट रोजी भारताची शान असलेला तिरंगाचा सन्मान राखावा यासाठी देखील जागृती केली जात आहे.
…. यांच्यातर्फे हे आवाहन
बेळगाव प्राईड सहेली यांच्यातर्फे सामाजिक उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा या मोहिमेत देशाप्रती आपली जबाबदारी म्हणून एक उपक्रम राबविण्यात आला आहे. हरघर तिरंगा च्या माध्यमातून घरोघरी लावण्यात आलेले तिरंगा इतरत्र न ठेवता प्राईड बेळगाव सहेलीच्या कार्यालयात आणून जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
माळी गल्ली येथील इनामदार कॉम्प्लेक्स मध्ये संस्थेचे कार्यालय असून दिनांक 20 ऑगस्ट पर्यंत तिरंगा जमा करावेत असे आवाहन बेळगाव प्राईड सहेलीच्या वतीने आरती शहा यांनी केले आहे.
हे देखील वाचा