Wednesday, March 12, 2025

/

मार्केट यार्ड भागात गांजा विकणारा गजाआड

 belgaum

बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात केली असून त्याच्याकडून 26 हजार रुपये किमतीचा 1 किलो 3 ग्रॅम इतका गांजा व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

गणेश राजू टिटंबी (वय 21, रा. खासबाग) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नांव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात एक जण गांजाची विक्री करत असल्याची खात्रीलायक माहिती शहर गुन्हा शाखेचे (सीसीबी) पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांना मिळाली.

सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी उपरोक्त संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून 1 किलो 3 ग्रॅम गांजासह एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीईएन पोलीस स्थानकात अमली पदार्थ तस्करी विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

उपरोक्त छाप्याच्या कारवाईत एच. एस. निसण्णावर, एस. बी. पाटील, एम. एम. वडेयर, एस.एम बजंत्री, वाय. डी. नदाफ आधी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.