Friday, January 3, 2025

/

बळ्ळारी नाल्यासंदर्भात पालकमंत्री ‘ऍक्टिव्ह मोड’वर!

 belgaum

बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली असून बेळगावमधील ऐरणीवर असलेल्या बळ्ळारी नाल्याच्या समस्येसंदर्भात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.

बळ्ळारी नाल्यातील जलपर्णींमुळे उद्भवणारी समस्या, बळ्ळारी नाल्यातून अतिरिक्त वाहणारे पाणी आणि यामुळे शेतकऱ्यांचे होणारी प्रचंड नुकसान यावर नुकतीच जिल्हा पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली होती. आज बोलाविण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीतदेखील हा मुद्दा मांडण्यात आला. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी हा मुद्दा उचलून धरत यावर कशापद्धतीने तोडगा काढावा यासंदर्भात पालक मंत्र्यांशी चर्चा केली. यावर पालकमंत्र्यांनी अधिकारी, लोकप्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग, मनपा, वनविभाग, बुडा आदींसह या नाल्याच्या समस्येसंदर्भातील निगडित प्रत्येक विभागाने या परिसराची पाहणी करून आराखडा आणि अहवाल तयार करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी दिली. आराखडा आणि अहवाल सादर केल्यानंतर पुन्हा या प्रश्नी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दरवर्षी येथील जलपर्णी काढावी, राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वापरण्यात आलेल्या पाइपलाइनमुळे उद्भवणारी समस्या मिटवावी, बोटिंग सुरु करण्यात यावे अशा महत्वपूर्ण सूचनांसह इतर सूचना पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.Bellari nala meeting karjol

यादरम्यान अधिकाऱ्यांशी पालकमंत्र्यांनी चर्चा करून येथील नेमक्या समस्यांबद्दल माहिती देण्याची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचा पाढा वाचला. मात्र पालकमंत्र्यांनी यावर तोडगा काढण्यासाठीही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, शेतकरी संघटना, स्थानिक आमदारांना घेऊनच आराखडा तयार करून येथील समस्या मिटवाव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

बळ्ळारी नाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी उद्भवणाऱ्या समस्यांवर पालकमंत्र्यांनी ‘पॉझिटिव्ह ऍक्शन’ घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे. कडक आणि निर्वाणीच्या सूचना देत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सोबतीला घेऊनच त्यांच्या समस्या जाणून घेऊन यावर आधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्यानंतर येत्या वर्षात तरी बळ्ळारी नाला परिसरातील शेतकरी मोकळा श्वास घेतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.