Wednesday, November 27, 2024

/

बेळगाव जिल्ह्यातील १६७६५ शिधापत्रिका रद्द

 belgaum

खोटी माहिती देऊन बीपीएल आणि अंत्योदय रेशन कार्ड घेतलेल्या नागरिकांना अन्न विभागाने दणका दिला असून बेळगाव जिल्ह्यातील १६७६५ जणांच्या शिधापत्रिकाच रद्द करण्यात आल्या आहेत.

महागड्या चारचाकी असलेल्या कुटुंबाकडेही अंत्योदय बीपीएल शिधापत्रिका असल्याचे आढळून आले असून या कुटुंबांना गेल्या अनेक वर्षांपासून दरमहा तांदूळ, मका, बाजरी मोफत मिळत आहे.

खोट्या माहितीच्या आधारावर घेतलेल्या शिधापत्रिका धारकांमधील १२ हजार कुटुंबातील,तीन लाख २२ हजार कुटुंबांची शिधापत्रिका अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने रद्द केल्या आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील १६७६५ शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.

परिवहन विभागांनी दिलेली माहिती रेशन कार्डशी जोडलेल्या आधारशी लिंक करणाऱ्या अन्न विभागाने मोटार असूनही १२५८४ कुटुंबाकडे बीपीएल आणि अंत्योदय कार्ड असल्याचे आढळून आले. राज्यातील रेशन कार्ड असलेल्या हजारो कुटुंबाकडे व्हाईट बोर्ड असलेल्या गाड्यांबाबत अन्न विभागाला संशय होता.

Reshan shop
Reshan shop file pic

या पार्श्वभूमीवर विभागाने परिवहन विभागाशी संपर्क साधून शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील सदस्यांकडून गाड्या खरेदी आणि नोंदणीची माहिती देण्यास सांगितले. यामध्ये शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे बावीस हजार कर्मचाऱ्यांना शिधापत्रिका मिळाल्याचे आढळून आले आहे. या सर्वांना नोटीस बजावून दंड भरण्याची निर्देश दिले आहेत.

सात दिवसात लेखी उत्तर देऊन हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून यापूर्वी स्वेच्छेने शिधापत्रिका परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. जर शिधापत्रिका परत करण्यात आल्या नाही तर सरकार स्वतः अशा शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन आतापर्यंत घेण्यात आलेल्या अन्नधान्याचा हिशोब करून ३५ रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे वसुली आणि फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.