अल्पावधीतच बेळगावकरांचा भरभरून प्रतिसाद मिळवणाऱ्या ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून अनेकवेळा नागरी समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात येतो. या समस्यांवर तातडीने तोडगाही काढण्यात येतो.
बेळगाव लाईव्ह वर प्रसारित झालेले वृत्त आणि वेळोवेळी प्रशासनाकडून घेतली जाणारी दखल यामुळे बेळगाव लाईव्ह वाचकांचा विश्वास द्विगुणित झाला आहे. अशाच एका नागरी समस्येवर गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव लाईव्ह च्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला होता.
रेल्वे मधून सिझन तिकिटामार्फत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसमोर उभ्या राहिलेल्या समस्येसंदर्भात एक वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत रेल्वे विभागाने तातडीने हि समस्या सोडविली आहे.
रेल्वे विभागाकडून विविध वर्गातील, दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘मासिक सिझन तिकीट’ योजना राबविण्यात येते. या सुविधेच्या माध्यमातून अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. यासाठी बेळगावमधील प्रवाशांसाठी बेळगाव-मिरज-कॅसलरॉक अशा विविध रेल्वेतून प्रवास करावा लागतो. दरम्यान या रेल्वेचे वेळापत्रक बदलण्यात आले आणि यामुळे प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय होऊ लागली.
सदर रेल्वेसेवा पूर्वीप्रमाणे योग्य वेळेत सुरु करण्यात यावी, अशी मागणी दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून केली गेली. याचसंदर्भातील वृत्त बेळगाव लाईव्ह वर प्रसारित करण्यात आले. यानंतर तातडीने रेल्वे विभागाने या वृत्ताची दखल घेत सदर रेल्वे सेवा पूर्ववत सुरु केली आहे.
रेल्वे क्रमांक १७३३३/१७३३४ मिरज-कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस आणि रेल्वे क्रमांक ०७३५२ लोंढा-मिरज एक्स्प्रेस स्पेशल या रेल्वेसेवा प्रवाशांच्या मागणीनुसार २७.०८.२०२२ पासून सुधारित वेळापत्रकानुसार धावणार आहेत.
नाममात्र दरात प्रवास करणाऱ्या नागरिकांना बदललेल्या रेल्वेच्या वेळापत्रकामुळे मोठी गैरसोय व्हायची. मात्र सुधारित वेळापत्रकानुसार पुन्हा पूर्ववत रेल्वे सेवा सुरळीत करण्यात येत असल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या सिझन तिकीट धारकांना दिलासा मिळाला आहे.
काल गुरुवारी बेळगाव live ने केलेली न्युज अशी होती
*’सिझन पास’ मार्फत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसमोर समस्या*
‘सिझन पास’ मार्फत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसमोर समस्या