बेळगाव- इस्कॉन तर्फे जन्माष्टमीनिमित्त श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 13 ते 18 ऑगस्टपर्यंत रोज सायंकाळी इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांची श्रीकृष्ण कथा संपन्न झाली. गुरुवार दि. 18 ऑगस्ट रोजी दर्शनासाठी मंदिर पूर्ण दिवस खुले ठेवण्यात येणार असून सायंकाळी आज अभिषेक, गौर आरती, नरसिंह आरती आणि भक्तीरसामृत स्वामी महाराजांचे प्रवचन व प्रसाद होईल .
शुक्रवार दि 19 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार ते नऊ या वेळात मंगल आरती, जप, गुरुपूजा व कृष्णकथा त्यानंतर दिवसभर भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होतील. सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत देणगीदारांचे अभिषेक, 9 वाजता
नाट्यलिला ,साडेदहा वाजता पुन्हा भक्तीरसामृत स्वामी महाराजांचे कथाकथन, रात्री बारा वाजता जन्म काळ आणि साडेबारा वाजता महाप्रसाद असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
*20 ऑगस्ट रोजी व्यासपूजा*
इस्कॉनचे संस्थापक आचार्य ए सी भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी असल्याने तो दरवर्षी व्यासपूजा म्हणून साजरा केला जातो. यंदाही तो 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते तीन वाजेपर्यंत गुरु गौरव, अभिषेक, अर्चना द्वारा साजरा केला जाणार आहे. त्यानंतर सर्वांसाठी प्रसाद ठेवला आहे, हे सर्व कार्यक्रम इस्कॉन बेळगावच्या फेसबुक वर लाईव्ह असतील. या सर्व कार्यक्रमात भक्तांनी सहभागी व्हावे आणि श्रीकृष्ण प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गोकुळ आले घरी पहा खालील व्हीडिओ-
गोकुळ आले घरी-
बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बोंगाळे यांनी सप्तमी निमित्त उद्या होणाऱ्या गोकुळ अष्टमीसाठी भगवान श्रीकृष्ण घरी आणून असे केले विधिवत पूजन केलेhttps://t.co/HH6nN62aAc pic.twitter.com/ZIcXuH966J— Belgaumlive (@belgaumlive) August 18, 2022