Wednesday, January 15, 2025

/

हुतात्मा चौकात झाले झेंडावंदन..

 belgaum

जायंट्स मेन आणि जायंट्स सखीच्या वतीने आज ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रम करण्यात आला.
मदन बामणे यांनी प्रास्ताविक करत असताना ऑगस्ट क्रांती दिनाबद्दल माहिती दिली.

९ ऑगस्ट १९४२ साली महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना ‘चले जाव’चा नारा दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सरकारी कचेर्‍या लुटल्या, सरकारी मालमत्तेचा विध्वंस केला. जनताच जर आपल्या विरोधात अशी पेटून उठली असेल तर आपण या करोडो लोकांवर राज्य करणार तरी कसे असा प्रश्‍न ब्रिटीशांना पडला. त्यांनी भारत देश सोडून जाण्याच्या निर्णयाची प्रक्रिया सुरू केली. पाच वर्षांनी ते भारत सोडून गेले. १५ ऑगस्ट१९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगष्ट क्रांतीमुळे निर्णायक अवस्थेत आला म्हणून या क्रांतिदिनाला महत्त्व आहे असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर जायंट्स मेनचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांच्याहस्ते स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.Flag hosting

ज्यांनी चलेजाव चळवळीचा नारा दिला त्या महात्मा गांधींच्या प्रतिमेस सखीच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे यांनी पुष्पहार अर्पण केला.हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष दिलीप सोहनी यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.शेवटी सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

यावेळी विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, मार्ग संघटनेचे अध्यक्ष अशोक पोतदार, उपाध्यक्ष सुनिल मुतगेकर, सचिव मुकुंद महागावकर,अशोक हलगेकर,अविनाश पाटील विजय बनसुर, लक्ष्मण शिंदे,मधू बेळगावकर,पद्मप्रसाद हुली, श्री कुलकर्णी,जायंट्स सखीच्या उपाध्यक्षा विद्या सरनोबत सचिव सुलक्षणा शिनोळकर,फेडरेशन डायरेक्टर नम्रता महागावकर, अर्चना कंग्राळकर व इतर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.