सिंगल विंडोमध्ये परवानगीच्या अंमलबजावणीसाठी थेट पोलीस स्थानकात जात मध्यवर्ती गणेश महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी कार्यतत्परता दाखविली आहे.
केवळ निवेदन न देता प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन मंडळाच्या अडीअडचणी समस्या स्वता जाणून घेऊन त्या निवारण करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून होत आहे महा मंडळ मंडळांना विविध ठिकाणी भेटी देत असून मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.
श्री सार्वजनिक गणेश उत्सवासाठी शहरातील गणेश मंडळांना विविध खात्याकडून एकाच ठिकाणी परवानगी देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन देताना महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांना देखील फोन करून तत्काळ सिंगल विंडोची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.
त्यावर पोलीस स्थानकामध्ये सिंगल विंडोची कार्यवाही सुरू आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी मध्यवर्ती गणेश महामंडळाची शिष्टमंडळ थेट पोलीस स्थानकात दाखल होत माहिती घेतली.
शहरातील मार्केट पोलीस स्थानकामध्ये केवळ चार गणेश मंडळांनी अर्ज केले आहेत महापालिका हेस्कॉम आणि पोलीस या सह सर्व खात्यानी मिळून एकत्रित परवानगी देण्याची ही सोय आहे.
मात्र अध्याप अद्याप सगळी खाती एकत्र आली नसल्याचे निदर्शनास आले त्यावर पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला त्यानुसार महापालिका आयुक्तांनी बुधवारी मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे बैठक बोलावली आहे.यावेळी मध्यवर्ती गणेश महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी,गणेश दद्दीकर,दीपक पावशे आदी उपस्थित होते.