मागील आठवड्यात कर्नाटकातील उत्तर कर्नाटक या स्वतंत्र राज्यासह देशात नवी राज्यं निर्माण होणार असल्याचे वक्तव्य करणारे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी केंद्राने आणखी जास्तीची 20 स्वतंत्र लहान राज्यं निर्माण केली पाहिजेत, अशी मागणी केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश व्यक्ती यांनी यापूर्वी कर्नाटकच्या विभाजनाचा मुद्दा उपस्थित करून उत्तर कर्नाटक प्रदेशाची स्वतंत्र राज्य म्हणून अनेकदा मागणी केली होती.
आता कत्ती यांनी उत्तम शासन आणि अधिक चांगल्या प्रशासनासाठी केंद्र सरकारने देशात आणखी 20 छोटी राज्य निर्माण करावीत अशी मागणी केली आहे.
उमेश कत्ती यांनी मागील आठवड्यात बेळगावातील कार्यक्रमात देशात 50 नवीन राज्ये निर्माण झाली पाहिजेत उत्तर प्रदेशात पाच,महाराष्ट्रात तीन आणि कर्नाटकात दोन राज्य व्हावी असे वक्तव्य केले होते त्यावर मोठा गदारोळ उठला होता.
केवळ कर्नाटकचं नव्हे तर महाराष्ट्रात देखील यावर बरीच चर्चा रंगली होती कर्नाटकातील अनेक मंत्र्यांनी कत्ती यांना घरचा आहेर दिला होता मात्र कत्ती यांनी यावर पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे.