कोरोना काळानंतर आता सर्व परिस्थिती निवळत आहे.यामुळे सण, समारंभ जत्रा,यात्रा उत्सव जोरदार सुरू आहेत. खनगाव ची जत्रा असून बुधवारी जत्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे कणबर्गी पासून पुढे गोकाक रोड पर्यंत मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे यामुळे जत्रेला जाणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीतून वाट काढत जाताना समस्येचा सामना करावा लागला.
प्रामुख्याने जत्रा यात्रा म्हटल्यानंतर मांसाहारी जेवणाचा बेत असतो यामुळे पाहुणे रावळे यांना आमंत्रित केले जाते.कोरोना काळानंतर दोन वर्षापासून जत्रा यात्रा मध्ये होणाऱ्या जेवणवळींना ब्रेक लागला होता. मात्र आता परिस्थिती सुरळीत होत असताना मोठ्या प्रमाणात जत्रा होत आहेत.
यामुळे खनगाव येथील काळमा देवीची जत्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दर तीन वर्षातून एकदा ही जत्रा पावसाळ्यात असते मात्र तरी देखील या ठिकाणी जत्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते यामुळे बुधवारी जत्रेचा मुख्य दिवस असताना मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेण्याबरोबरच देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती
यामुळे वाहतूक कोंडीतून वाट काढत वाहने काढताना तसेच चालत जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली कणबर्गी पासून पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पादचाऱ्यांबरोबरच दुचाकी चार चाकी वाहने आणि यातून वाट काढणारे नागरिक असे चित्र पाहायला मिळाले. यामुळे नागरिकांना मात्र याचा चांगलाच त्रास सहन करावा लागला.गोकाक रोड मुख्य रोड असल्यामुळे परिवहनच्या बसेस तसेच ट्रक अशी मोठी वाहने देखील या रस्त्यावर पाहायला मिळतात. यामुळे कार,दुचाकी वाहने त्यातूनही वाट काढताना कसरत करावी लागली.