हवाई वाहतूक क्षेत्रातील स्टार एअर या संजय घोडावत यांच्या नेतृत्वाखालील भारतातील आघाडीच्या विमान कंपनीकडून आता त्यांच्या बेळगाव येथील केंद्राच्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
स्टार एअर कंपनीला एम्बरर 145 आणि एम्बरर 175 ही विमाने चालविण्यासाठी त्यांच्या बेळगाव येथील केंद्रामध्ये अनुभवी वैमानकांची गरज आहे. तेंव्हा जर तुमची रूपरेखा (प्रोफाइल) स्टार एअरलाइन्सच्या आवश्यकतेशी जुळत असेल तर आपण [email protected] या ठिकाणी अर्ज करू शकता.
भरती पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. ट्रान्झिशन कॅप्टन्स : विमान चालवण्याचा अनुभव किमान एकूण 4500 तास /किमान 1000 पीआयसी तास. प्राधान्याने ग्लास कॉकपिट आणि जेट विमानाचा अनुभव, प्रशिक्षण -कंपनी पुरस्कृत. सीनियर फर्स्ट ऑफिसर्स : किमान एकूण 1500 तास/ एटीपीएल अनिवार्य,
प्राधान्याने ग्लास कॉकपिट आणि जेट विमानाचा अनुभव, प्रशिक्षण -50 टक्के कंपनी पुरस्कृत. स्टार एअरचे सीईओ सिमरनसिंग तैवान यांनी केलेल्या ट्विटनुसार स्टार एअरलाईन्सला यंदा नवी कोरी एम्बरर 175 (ई 175) विमानं यावर्षी मिळणार आहेत.