Thursday, May 16, 2024

/

रविवारी शहापूर गणेश महामंडळाची बैठक

 belgaum

मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्री साई गणेश को ऑप सोसायटीच्या सभागृहात नाथ पै चौक, अंबाबाई मंदिरासमोर शहापूर या ठिकाणी बोलवण्यात आली आहे.

नुकत्याच प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत पी ओ पी मूर्तीवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे तरी या निर्णयावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार असून गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्या संदर्भात पदाधिकाऱ्याकडून सूचना तक्रारी ऐकून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या येणार आहेत.

तरी समस्त गणेशोत्सव पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहापूर विभाग गणेश महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव कार्याध्यक्ष रमेश सोंटक्के उपाध्यक्ष अशोक चिंडक यांनी केले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.