सध्या पाऊस सुरू झाल्याने सर्पाची वर्दळ वाढली आहे आणि ते कुठ ही येऊ शकतात त्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थाने देखील चुकली नाहीत.
बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी साप शिरला होता. चक्क स्वयंपाक घरातील रॅक मध्ये सर्प शिरलेला येथील सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी पाहिला
सदर कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण केले चिट्टी त्यांनी त्वरित घटनास्थळी येऊन रॅक मध्ये लपलेल्या सर्पाला बाहेर काढले अन जीवनदान दिले.
साधारण दोन वर्ष वयाचा हा धामण जातीचा बिनविषारी सर्प असून.तो उंदराच्या पाठीमागे असताना छतातून खाली पडला व रॅक मध्ये शिरला या सर्पा पासून काही धोका नाही तो उंदीर मोठ्या प्रमाणात खातो या पूर्वीही येथे धामण सर्प सापडले असल्याचे चिट्टी यांनी सांगितले.