पर्यावरणाची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे यंदा सलग तिसऱ्या वर्षी पर्यावरण पूरक गणपती (इको फ्रेंडली गणपती) विक्री उपक्रम मूर्ती सोबत झाडाचे रोपटे देण्याद्वारे राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक श्री मूर्ती माफक दरात उपलब्ध केल्या जाणार आहेत.
देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थने ही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विक्री संकल्पना सुरू केली आहे. मागील 2020 सालापासून रोटरी क्लब बेळगाव नॉर्थतर्फे हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातून जो निधी संघटित होईल तो निधी रोटरी फाउंडेशनतर्फे रोटरी ग्लोबल ग्रांट मार्फत समाजासाठी उपयोगात आणला जाणार आहे. रोटरीने श्रीमूर्ती वेगवेगळ्या आकारात व वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध केल्या आहेत. यापैकी 12 ते 14 इंच उंचीची श्री मूर्ती चार ते पाच मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत. तसेच 18 इंच श्री मूर्ती सहा मॉडेलमध्ये उपलब्ध केली असून 24 इंची श्री मूर्ती पाच मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.
सध्या दरवाढ व महागाई सुरू असूनही रोटरी नॉर्थने श्रीमूर्तीचा दर वाढवला नसून यंदा मागील वर्षीचाच दर ठेवला आहे. दरामध्ये काही फरक केलेला नाही. या खेरीज मागील वर्षीपेक्षा यावेळेस फार सुंदर सुबक मोहक श्रीमूर्ती उपलब्ध केल्या आहेत. 12 ते 14 इंची मूर्तींचा दर 800 रु., 18 इंची मूर्तींचा दर 1500 रु. आणि 24 इंची श्रीमूर्तीचा दर रुपये 2100 इतका ठेवण्यात आला आहे. तसेच प्रत्येक श्री मूर्ती सोबत एक रोपटेही मोफत देण्यात येणार आहे.
जनतेच्या सोयीसाठी शहर व उपनगर भागात सहा डिस्प्ले व पिकअप पॉईंट ठेवण्यात आले आहेत. टिळकवाडी शहापूर भागाकरिता गोवावेस येथील बामणे टाॅवर अपोझीट फायर स्टेशन (संपर्क -मंगेश कंटक मो. क्र. 9449650184), भाग्यनगरसाठी रो. दुर्गेश हरिते यांचे रमाश्री, भाग्यनगर सेकंड क्रॉस येथील निवासस्थान (संपर्क -दुर्गेश हरिते मो. क्र. 9448142606) तसेच विजयनगर हिंडलगा जनतेसाठी विजयनगर बस स्टॉप येथील फ्लोरन्स जनरिक मेडिकल (संपर्क -रो. राम कोकणे मो. क्र. 8748076999 अथवा रो.
सागर कोळी मो. क्र. 9743409511) येथे श्री मूर्ती प्रदर्शनासह विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. या खेरीज रामतीर्थनगर येथे ऑटोनगर रोड, अपोलो टायरच्या बाजूला (संपर्क -रोटरी नोर्थ अध्यक्ष जी एस पाटील मो. क्र. 9945059977), कुमारस्वामी लेआउट येथे शिवालयामध्ये (संपर्क -रो. उमेश गोरबाल मो. क्र. 7406467555) श्रीमूर्ती प्रदर्शनासह विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. शाहूनगर भागाकरता रो. जितेंद्र बामणे (मो. क्र. 9483516969) यांच्याशी तर शहरी भाग व कॉलेज रोड करिता रो. नॉर्थचे सेक्रेटरी सुरज ओझा (मो. क्र. 8792825318) या यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.