खानापूर जांबोटी क्रॉस ते गोवा क्रॉस या रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीकडे मागणी करून ही दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे इशारा दिल्यानुसार खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली रुमेवाडी क्रॉस येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध नोंदविण्यात आला.
जांबोटी क्रॉस ते गोवा क्रॉस या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असल्याने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशा मागणीचे निवेदन गेल्या 7 जुलैला देण्यात आले होते. त्याचप्रमाणे मागणीची पूर्तता न झाल्यास 18 जुलै रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
इशारा देऊनही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेला हा रस्ता दुरुस्त केला नसल्याने आज सोमवारी सकाळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली रुमेवाडी क्रॉस येथे रास्ता रोको करण्यात आला.
त्याचप्रमाणे येथील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सदर आंदोलनात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत रूमेवाडी आणि परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन याल यांना यावेळी निवेदन दिल्या देण्यात आले निवेदनाचा स्वीकार करत त्यांनी सोमवारच्या आत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले
खानापूर तालुक्यामधील करंबळ ते रूमेवाडी क्रॉस रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात वाढले आहेत या रस्त्यांमध्ये खड्डे आहेत त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवत असताना खूप कसरत करावी लागत आहे.