हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील बेळगावसह किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये उद्या मंगळवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत व्यापक मध्यम ते अतिशय मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मलनाड प्रदेशातील काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.
दक्षिण कर्नाटकाच्या अंतर्गत भागातील चित्रदुर्ग, दावणगिरी, तुमकुर, रामनगर, मंड्या आणि म्हैसूर जिल्ह्यामध्ये उद्या शुक्रवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत विखुरलेला रिमझिम ते मध्यम प्रतीचा पाऊस, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कर्नाटकाच्या अंतर्गत भागातील बेळगाव आणि बिदर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह रिमझिम तसेच मध्यम स्वरूपाचा तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये विखुरलेला रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बेळगाव जिल्ह्यात मात्र उद्या सकाळपर्यंत कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मलानाड प्रदेशातील चिकमंगळूर, कोडगु, हासन आणि शिमोगा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विखुरलेला रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीच्या प्रदेशातील उडपी मंगळूर आणि कारवार जिल्ह्यामध्ये उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत विखुरलेल्या मध्यम आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.