बेळगाव ग्रामीण पोलिसांनी धाड मारून सुमारे 7 लाख किंमतीचा 31 टन, 320 क्विंटल अवैध रेशन तांदूळ जप्त केला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धाड टाकून
1) वसीम मुजावर रा.हुंचेनहट्टी २) संजय भोसले रा. पिरणवाडी याना अटक करण्यात आली आणि त्याने बेकायदेशीररीत्या जमा केलेला 31 टन, 320 क्विंटल अंदाजे 7,21,050/- किंमतीचा बेकायदेशीर रेशन तांदूळ जप्त करण्यात आला .
आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. पोलीस आयुक्त, डीसीपी यांनी धाड टाकून तांदूळ जप्त करणाऱ्या पीआय ग्रामीण आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.