गोकाक नजीकच्या होनकुप्पी येथे उसाच्या मळ्यामध्ये पिकवण्यात आलेली सुमारे 10 लाख किमतीची 95 किलो गांजाची झाडे कुलगोड पोलिसांनी जप्त केली असून याप्रकरणी पिता-पुत्राला ताब्यात घेण्यात आले आहे.
बसप्पा रंगप्पा लगळी आणि सिद्धाप्पा बसप्पा लगळी अशी अटक करण्यात आलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. लगळी कुटुंबाने आपल्या शेतातील ऊसाच्या मळ्यामध्ये गांजाची लागवड केली होती.
याबाबतची माहिती मिळताच काल शुक्रवारी पहाटे कुलगोड पोलिसांनी छापा टाकून होनकुप्पी येथे उसाच्या पिकामध्ये पिकविलेला सुमारे 95 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला.
बाजारपेठेत या गांजाची किंमत 9 लाख 95 हजार रुपये इतकी होते. सदर प्रकरणी लगळी बापलेकांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.