गुरुपौर्णिमानिमित्त पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराजांच्या पादुकांना उद्या बुधवार दि. 13 जुलै रोजी पंचामृत अभिषेक आणि लघुरुद्र अभिषेक घालण्यात येणार आहे.
पंत बाळेकुंद्री श्रीदत्त संस्थानच्यावतीने यावेळी तीसहजार पंचामृत अभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सकाळी 7 वा. सकाळची आरती, 8 वा. गुरुपौर्णिमा अभिषेक संकल्प सोडणे, 9.30 वा. लघुरुद्र अभिषेक आणि सामुदायिक अभिषेक, दु. 12 वा. आरती त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6.30 वा. पालखी सेवा होणार आहे.
ज्या भाविकांना प्रत्यक्ष अभिषेक करावयचा आहे, त्यांनी सकाळी 8 वा मंदिरात रहावे.
तसेच सोवळे आणि उपरणे आणणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण सकाळी 8 ते दु 1 या वेळेत करण्यात येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंत बाळेकुंद्री
श्रीदत्त संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.