Friday, December 27, 2024

/

मध्यवर्ती’कडून आम. चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन

 belgaum

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी -सदस्यांनी मंगळवारी दुपारी कोल्हापूर मुक्कामी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले.

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील (वय 91) यांचे काल रविवारी सायंकाळी वृद्धापकाळाने संभाजीनगर, कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन झाले होते.

यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली दत्ता उघाडे, महेश जुवेकर, राजू ओऊळकर व जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी आज कोल्हापूर मुक्कामी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

काल सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोल्हापूरला भेट देत चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन केलं होतं त्या व्यतिरिक्त दिल्लीहून भाजपाचे आठ खासदार आणि एक राज्यमंत्री भागवत कराड हे देखील बेळगाव मार्गे विमानाहून कोल्हापूरला जाऊन चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन केलं होतं आणि परत बेळगाव मार्गे दिल्लीला रवाना झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.