महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक शिवसैनिक मूळ शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जात आहेत मात्र बेळगाव सीमा भागामध्ये बहुतांशी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत.
बेळगाव येथील शिवसैनिकांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये बेळगाव येथील शिवसेनेकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.या बैठकीत बुधवार दिनांक 27 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहापूर येथील हॉटेल समुद्र येथे घेण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बेळगावमधील लोकमान्य टिळक चौक येथे बेळगाव जिल्ह्यातील समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन साजरा करण्यात येणार आहे.
या जन्म दिनाच्या कार्यक्रमाला समस्त शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनशिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि ज्येष्ठ शिवसैनिक व आरोग्य विभाग जिल्हा प्रमुख दत्ता जाधव यांनी केले.
या बैठकीला शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, जिल्हा संघटक रवींद्र जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी नगरसेवक राजू आजगावकर, बाळासाहेब डंगरले, रिक्षा सेनेचे विजय मुरकुटे, शंकर बिरजे तसेच मंगेश नागोजीचे, सुनील माळवी, विनायक कोवाडकर, प्रकाश हेब्बाजी, महेश टंकसाळी, निरंजन अष्टेकर, विठ्ठल हुंदरे, अशोक काकतकर यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.