धारवाड एसडीएम येथून बेळगावच्या केएलई हॉस्पिटलपर्यंत जिवंत हृदयाची वाहतूक करण्यासाठी पोलिसांनी धारवाड ते बेळगाव ग्रीन कॉरिडोरची(झिरो ट्रॅफिक) व्यवस्था केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली.
धारवाड एसडीएम येथे दात्याकडून हृदय ताब्यात घेतल्यानंतर आज सोमवारी दुपारी ते रस्ते मार्गे धारवाडहून रवाना करण्यात आले ज्याचे सायंकाळी 4 वाजता बेळगावात आगमन झाले.
डॉक्टरांनी मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याचे घोषित केलेल्या एका महिलेच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्या अवयवांपैकी महिलेचे हृदय बेळगावच्या केएलई हॉस्पिटलकडे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे.
सदर जिवंत हृदय द्रुतगतीने वेळेत केएलईमध्ये पोहोचावे यासाठी पोलिसांनी धारवाड ते बेळगाव ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली होती.